प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण ; तर अस आहे सगळं असं म्हणत केला व्हिडिओ पोस्ट

मुंबई : अभिनेते प्रशांत दामले prashant damale यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः त्यांनी फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. कोरोना झाल्यामुळे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचे पुढचे काही प्रयोग त्यांनी रद्द केल्याचे म्हंटले आहे. लॉक डाऊन उठल्यानंतर सर्व सुरळीत होत असताना नाटकांचे प्रयोग ही सुरू व्हावेत यासाठी दामले यांनी पुढाकार घेतला होता. सरकारची परवानगी मिळाल्यानंतर १२ डिसेंबर रोजी पण्यात व पिंपरी चिंचवड येथे एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचे प्रयोग झाले होते.
चिंचवड येथील प्रयोग करून मुंबईला गेल्यानंतर दामले यांना कणकण जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी कोरोना टेस्ट करून घेतली. या टेस्ट चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांनी त्यांना सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दामले यांनी व्हिडिओ मध्ये म्हंटले आहे की, मला कणकण वाटत होती. म्हणून मी बुधवारी करोना टेस्ट कली. त्यात मी काठावर पास झालो आहे. तसा काठावर पास मी शाळेपासूनच आहे. पण हा काठ जरा डेंजर आहे. त्यामुळे डॉक्टर म्हणाले की काठावर जरी असलात तरीही सात दिवसांच्या आयसोलेशनमध्ये तुम्हाला जावं लागेल. असं आपल्या विनोदी शैलीत त्यांनी सांगितले आहे.
माझे सगळे सहकलाकार, ठणठणीत आहेत. मीच थोडासा काठावर आहे. काठावरचा मी थोडासा मागे येतो आणि पुन्हा काम सुरु करतो. मी काळजी घेतो तुम्हीही काळजी घ्या.” असा संदेश त्यांनी दिला आहे.







