अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा ‘कोथरूड भूषण पुरस्कार २०२३’ युवा बांधकाम व्यावसायिक प्रविण बढेकर यांना प्रदान

कोथरूड : अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिति ट्रस्ट च्या वतीने आयोजित “श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा” गोपाळ भक्तांच्या उपस्थित जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा यंदाचा कोथरूड भूषण पुरस्कार २०२३” युवा बांधकाम व्यावसायिक प्रविण केशव बढेकर यांना प्रदान करण्यात आला. यावर्षी मंडळाचे रौप्य महोत्सवी २५ वे वर्ष होते.
कोथरूड मधील पौड रस्त्यावर असणाऱ्या अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कोथरूडमधील व्यक्तींचा कोथरूड भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यावर्षीचा मानाचा “कोथरूड भूषण पुरस्कार २०२३” बांधकाम क्षेत्रामध्ये कमी कालावधीमध्ये गुणवत्ता, प्रामाणिकपणा व सचोटीच्या जोरावर उत्तुंग भरारी घेणारे
कोथरूडमधील युवा बांधकाम व्यावसायिक “बढेकर ग्रुपचे” चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक प्रविण केशव बढेकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष दीपक मानकर व प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री नुशरत भरुचा, मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ उदगिरी शुगर आणि पॉवर लि. चे चेअरमन डॉ. राहुल शिवाजी कदम, संस्थापक ॲड. राहुल म्हस्के पाटील व अध्यक्ष अमित जाधव, खजिनदार ॲड. अतुल म्हस्के व ट्रस्टचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावर्षीची दहीहंडी ठाण्याच्या मराठा गोविंदा पथकाने सहा थर लावून फोडली. या कार्यक्रमास पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पुणे कॅन्टोमेंट विधानसभेचे आमदार सुनील कांबळे, प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर,
सिनेअभिनेता देवदत्त नागे व प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री संगीता बिजलानी यांची उपस्थिती लक्षणीय होती.






