कोथरुड

सोमवार पासून नवरात्रात रंगणार कोथरूड सांस्कृतिक महोत्सव ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोथरुड : सोमवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी घटस्थापना होत असून असून पुढील दहा दिवस क्रिएटिव्ह फाउंडेशन व कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानच्या वतीने कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध कार्यक्रमांमुळे हा सांस्कृतिक महोत्सव रंगणार असल्याची माहिती क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी दिली.

यावेळी कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके,माजी नगरसेविका व उत्सव प्रमुख मंजुश्री खर्डेकर व श्वेताली भेलके, कार्याध्यक्ष उमेश भेलके उपस्थित होते.आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक बांधिलकी देखील जपतो व सामान्यांच्या हिताच्या अनेक कार्यक्रमांचा अंतर्भाव या  महोत्सवात असतो असे ही खर्डेकर यांनी सांगितले.

कोथरूडच्या डी पी रस्त्यावर भेलकेवाडी येथे देवीची स्थापना करण्यात येणार आहे, मात्र येथे देखील मंडळाने सामाजिक जाणीव जपली असून येथील प्रचंड वाहतुकीला होणारा अडथळा लक्षात घेता मांडवाची रुंदी ही परवाना असलेल्या 25 फुटाची न करता 16 फुटाची केल्याचे ही संदीप खर्डेकर आणि विशाल भेलके यांनी स्पष्ट केले.

Img 20220924 182515 453

पूर्णपणे मोफत प्रवेश असलेल्या या सांस्कृतिक महोत्सवात  गुरुवार 29 सप्टेंबर ला रात्री 9 वाजता बायको कमाल मेहुणी धमाल हे नाटक यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सादर केले जाणार आहे, तर शुक्रवारी 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता महिलांसाठी तुमच्यासाठी काय पण हा लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार 1 ऑक्टोबर रोजी सायं 6 वाजता बालजत्रा, रविवारी 2 ऑक्टोबर रोजी अस्सा भोंडला सुरेख बाई व महाआरती, सोमवार 3  व मंगळवार 4 ऑक्टोबर दांडिया,  5 ऑक्टोबर रोजी मंगळागौर व देवीची गाणी आणि कोजागिरी पौर्णिमेला दांडिया व दुग्धपानाने महोत्सवाची सांगता होईल असे संदीप खर्डेकर, विशाल भेलके व उमेश भेलके यांनी सांगितले.

याच दरम्यान दुर्गम भागातील गरजू विद्यार्थिनींना स्वेटर वाटप, विशेष मुलांना चित्रपट दाखविणे, तृतीयपंथीयांना मदत असे अनेक समाजोपयोगी उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत.

Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये