महाराष्ट्र

शिवसंग्राम संघटनेची पुण्यात राज्यस्तरीय बैठक संपन्न ; महत्वाचे तीन ठराव एकमताने मंजूर

पुणे : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर शिवसंग्राम संघटनेची आज प्रथमच राज्यस्तरीय बैठक पुणे येथे पार पडली. विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ.ज्योती मेटे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडलेल्या या बैठकीत काही महत्वपूर्ण ठराव करण्यात आले.

यावेळी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांच्यासह राज्यभरातील सर्व जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मेटे यांच्या मृत्यूनंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली नैराश्य व दुःखाची भावना दूर करण्यासाठी  डॉ ज्योती मेटे यांनी रिक्त झालेले राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावे हा पहिला ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला. तसेच
महायुतीतील मित्रपक्ष म्हणून भाजपने स्व.मेटे यांना विधानपरिषदे सह मंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता. आता त्याचे पालन करत डॉ.ज्योती मेटे यांना विधानपरिषद व मंत्रीपद मिळणे हा आमचा हक्क देऊन भाजपने वचनपूर्ती करावी असा दुसरा ठराव एकमुखाने पारित करण्यात आला.

स्व.मेटे साहेबांनी मराठा आरक्षण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक आदी. बाबींसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या माघारी हतबल न होता डॉ.ज्योती मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली दुप्पट जोमाने वरील विषय सोडविण्यासाठी शिवसंग्रामचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता कटिबद्ध असेल, हा तिसरा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ.ज्योती मेटे म्हणाल्या की स्व.साहेब हे स्वतःच्या कुटुंबाप्रमाणेच शिवसंग्रामला आपले कुटुंबच मानत होते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर, त्यांची उत्तराधिकारी म्हणून कुटुंबप्रमुख ही जबाबदारी माझ्यावर आलेली आहे व मी या शिवसंग्रामचा माझ्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही. राज्यातील सर्वच कार्यकर्त्यांच्या बळावर मी स्व.मेटे साहेबांचे अधुरी राहिलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू !

वरील बैठकीला शिवसंग्राम गुजरातचे प्रदेशाध्यक्ष मनीष पगार,  राज्याचे सरचिटणीस विक्रांत आंब्रे, उपाध्यक्ष संदीप पाटील, राजन घाग, युवकाध्यक्ष उदय आहेर, धुळे जि.प.सदस्य ज्ञानेश्वर भामरे, बीडचे अप्पा कोलंगडे प्रदेश सचिव शेखर पवार, प्रवक्ते प्रफुल्ल पवार आदींसह राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख हजर होते.
बैठकीचे आयोजन पुणे शहराध्यक्ष भरत लगड, केतन महामुनी, कालिंदि गोडांबे, सचिन दरेकर, लहू ओहोळ, समीर निकम, विनोद शिंदे, संगीता घुले, चेतन भालेकर, कल्याणराव अडागळे आदींनी केले होते.

Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये