महाराष्ट्रराजकीय

नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, अटकेची शक्यता

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे पूत्र नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे नील सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे अटक टाळण्यासाठी नील सोमय्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पण, तिथे दिलासा मिळाला नाही. अतिरिक्त सत्र  न्यायाधीश दीपक भागवत यांच्यासमोर आज सुनावणी पार पडली. पण न्यायाधीशांनी जामीन अर्ज मंजूर करण्यास स्पष्ट नकार दिला.

Whatsapp image 2022 03 01 at 8. 13. 02 am

पीएमसी बँक घोटाळ्यात आरोपी वाधवान हा किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या कंपनीत संचालक आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसा नील सोमय्या यांनी एका प्रकल्पात गुंतवल्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोप केला होता. या प्रकरणी नील सोमय्या यांनी आपल्याला अटक होऊ शकते म्हणून सत्र न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. पण नील सोमय्याच्या  अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे अटकेची शक्यता वाढली आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. “ईडीवाले सुनो. सीबीआयवाले सुनो. सगळ्यांनी ऐका जरा माझं. हा जो किरीट सोमय्या आहे, हा एक फ्रॉड आहे. त्यांनं बँक घोटाळा केलाय. लोकांचे पैसे बुडवलेत. तर मी विचारतो की, निकॉन इन्फ्रा कंन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची? तर किरीटची. नील सोमय्याची. आणि हा राकेश वाधवानचा पार्टनर आहे. मौजे गोखिवरे वसईत यानं तिथं एक प्रोजेक्ट केलाय. वाधवानला यांनीच ब्लॅकमेल केलं. आणि त्याला लुबाडलं. आपल्या फ्रंटमॅनच्या नावे व्यवहार केले. कॅशही घेतली. 100 कोटी घेतले. लधानीच्या नावावर त्यांनी जमिनी घेतल्या. 400 कोटी रुपयांची जमीन फक्त 4.4 कोटी रुपयांनी घेतली. अशा वेगवेगळ्या जमिनी घेतल्या. या कंपनीचा डायरेक्टर आहे नील किरीट सोमय्या. निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभारले जात आहेत. पर्यावरणाच्या परवानग्या नाही, हरित लवादानं एक्शन घेतली तर त्यावर कारवाई होईल. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना माझं आवाहन आहे, याची ताबडतोब चौकशी करुन निल सोमय्याला अटक करा”, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती.

Img 20220225 wa00035521681856149145908

“मुळात पीएमसी घोटाळ्यातील आरोपीनं सोमय्याच्या जवळच्या माणसाला का जमीन विकली? आणि हा भ्रष्टाचाराविरोधात लढणारा माणूस आम्हाला ज्ञान देतोय, आम्हाला अक्कल शिकवतोय. एकीकडे भ्रष्टाचारविरोधाची भजनं करायची आणि दुसरीकडे भ्रष्टाचार करायचा. देवेंद्र लधानी हा सोमय्याचा फ्रंटमॅन आहे. त्याच्या नावे व्यवहार केले जात आहेत. याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी”, अशी देखील मागणी राऊतांनी केली आहे.

“पीएमसीचा तपास ईडी करतेय. हे सगळे कागद ईडीकडे पाठवले आहेत. सोमय्यांच्या भ्रष्टाचाराचे कागद किमान तीन वेळा ईडीत पाठवलेत. तुम्ही एक दोन गुंठ्यांच्या लोकांना बोलावता. सोमय्या ईडीच्या ऑफिसात दही खिचडी खात असतो. ईडी भ्रष्ट आहे. हे सगळे ईडीचे वसुली एजंट झालेत, हा माझा दावा आहे”, असं संजय राऊत म्हणाले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये