क्रीडा

कॅप्टन कूल धोनीची निवृत्ती चाहत्यांसाठी धक्का

कॅप्टन कूल धोनीची निवृत्ती चाहत्यांसाठी धक्का
भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार धोनी भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार असा बहुमान मिळालेल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने शनिवारी(ता.१५ ) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.     त्याच्या या अचानक निर्णयामुळे दोन्हीचे जगभरातील चाहते कमालीचे नाराज झाले आहेत. आपल्या शैलीला साजेसा असाच निर्णय त्याने घेतल्याच्या प्रतिक्रिया संपूर्ण क्रीडा विश्वातून व्यक्त होत आहेत.आयसीसीच्या सर्व प्रकारांमधील विजेतेपद मिळवून देणारा जगातील एकमेव कर्णधार असलेल्या भारताच्या या खेळाडूने आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द ही चांगलीच गाजवली आहे. धोनी ने अनेक विक्रमांची नोंद केली आहे. 2007 मध्ये टी- 20 संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली. आणि पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवत पहिला टी-20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधार पदही त्याने आपल्या स्टाईलनेच भूषवले. कसोटीमध्ये त्याने टीम इंडियाला आयसीसीच्या रँकिंगमध्ये टॉप वर नेले. त्यानंतर भारताच्या भूमीत झालेल्या २०११ च्या वन डे वर्ल्डकप मध्येही आपला करिश्मा कायम ठेवत आयसीसीचे विजेतेपद पटकावले.मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला हरवत भारताने दुसऱ्यांदा विश्व विजेतेपदावर नाव कोरले.      त्यापूर्वी भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली १९८३  झाली साली पहिला वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. २०१३ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडला इंग्लंडमध्येच पराभूत करत धोनीच्या नेतृत्वाखाली आयसीसीची तिसरी ट्रॉफी पटकाविली. यासोबतच धोनीने व्यवसायिक क्रिकेट लिस्टमध्येही आपली कॅप्टन कूल इमेज कायम राखली. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) चेन्नई सुपर किंग संघाचे नेतृत्व करताना त्याने तीन वेळा आयपीएलचे ट्रॉफी वर चेन्नईचे नाव कोरले. तसेच चॅंपियन्स लीग टी ट्वेंटी मध्ये २०१० आणि २०१४ चे विजेतेपद चेन्नईला जिंकून दिले आहे. दरम्यान २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताचे विजेतेपद हुकले. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळताना भारताला काहीच धावांची गरज असताना धोनी धोनी रन आऊट झाला. आणि तीच त्याची शेवटची खेळी ठरली. धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीवर नजर टाकल्यास धोनीला टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार का म्हटले जाते आहे. हे समजून येईल. तिसऱ्या क्रमांकापासून  ते सातव्या क्रमांकापर्यंत कोणत्याही वेळी फलंदाजी करण्याची तयारी ठेवणारा कॅप्टन धोनीने अनेक रेकॉर्ड आपल्या टीम इंडियाच्या नावेही केले आहेत.धोनीने ९० कसोटी सामने खेळताना ३८.१ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ३३ अर्धशतके ६ शतके फटकावली आहेत. तसेच ३५० वन डे सामन्यात त्याने ५०.६  च्या सरासरीने १०७७३ धावांची बरसात केली आहे.पाकिस्तान विरुद्ध नाबाद 183 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे..

No photoReplyReply allForward

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये