पुणे शहर

पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन बँक निवडणूक : पाच उमेदवारांनी माघार घेत श्री स्वामी समर्थ पॅनेलला दिला पाठिंबा

पुणे : पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्व्हंट्स को- ऑप. अर्बन बँक लि. पुणे या बँकेची निवडणूक जाहीर झाली असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी हि निवडणूक पार पडणार आहे. या निवडणूकीसाठी उमेदवारी माघार घेण्याची आज अंतिम मुदत होती. आज पाच उमेदवारांनी अर्ज माघारी घेत स्वामी समर्थ पॅनेलला पाठींबा जाहीर केला आहे.

पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन बँक निवडणूकीसाठी  स्वामी समर्थ पॅनेलची काल पॅनेलप्रमुख व माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत  राजेश ज्ञानेश्वर जगताप, संदिप अशोक परदेशी, मंगेश तानाजी पानसरे, संजय पिराजी गायकवाड, विशाल बाळासाहेब शिंदे या पाच विरोधी उमेदवारांनी माघार घेऊन पाठिंबा देण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार त्यांनी आज उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी माघार घेत स्वामी समर्थ पॅनेलला पाठिंबा जाहीर केला.

Fb img 1647413711531 1

मागील पंचवार्षिकमध्ये स्वामी समर्थ पॅनेलच्या संचालक मंडळाने केलेल्या चांगल्या कामामुळे, व्याज दर कमी करून कर्ज मर्यादा वाढवली. विस्तारित दोन नव्या शाखा सुरू केल्या तसेच नविन दोन शाखांना मंजुरी मिळाली आहे. भविष्यात हि अशाच प्रकारे चांगले काम व्हावे. यासाठी आमचा स्वामी समर्थ पॅनेलला पाठिंबा असल्याचे माघार घेत पाठिंबा जाहिर करणाऱ्या राजेश ज्ञानेश्वर जगताप, संदिप अशोक परदेशी, मंगेश तानाजी पानसरे, संजय पिराजी गायकवाड, विशाल बाळासाहेब शिंदे यांनी सांगीतले.

पॅनेलप्रमुख व माजी उपमहापौर दीपक मानकर म्हणाले, मागील पाच वर्षात आमच्या पॅनेलच्या संचालकांनी चांगले काम केले आहे. तसेच आगामी काळात अनेक सुधारणा करण्याचे नियोजन आहे. सर्व सभासदांचा आमच्या पॅनेलवर विश्वास असल्याने आमचा विजय निश्चित होणार आहे.

Img 20221012 192956 045 1
Img 20221110 wa00073901519538805506528

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये