महाराष्ट्र

पुण्यात 232 पोलिसांना कोरोना संसर्ग…

पुणे : पुण्यात गेल्या आठ दिवसात 232 पोलिसांना कोरोना संसर्ग झाला आहे. मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना देखील कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत जवळपास सर्वच पोलिसांची अँटिजेन कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात 202 कर्मचारी आणि 30 पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी, पत्रकार यांचा दैनंदिन काम करत असताना नागरिकांशी संपर्क जास्त असल्याने त्यांच्यामध्ये कोरोना संसर्ग वाढताना दिसत आहे.

Img 20220108 wa0160

राज्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असल्याने शासनाकडून निर्बंध कडक करण्यात आले आहेत. मात्र या निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिकारी व पोलिसांवर असते, प्रत्यक्ष काम करत असताना अनेकांशी संपर्क येत असल्याने आता अधिकारी, पोलीस व पत्रकार यांना कोरोना संसर्ग होताना दिसत आहे.

Whatsapp image 2022 01 05 at 1. 18. 18 pm
Screenshot 20211227 1402344603556305344739789
Img 20220109 wa00179010930592176227098

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये