पुणे शहर

संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णीविरुद्ध उच्च न्यायालयात दावा दाखल करणार : डॉ. कुमार सप्तर्षी

पुणे : महात्मा गांधींच्या पित्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णीवर उच्च न्यायालयात खटला दाखल करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ कुमार सप्तर्षी यांनी गांधीभवन येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

म. गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त असून त्यांनीही भिडेच्या वक्तव्याचा निषेध केल्याची माहिती त्यांनी दिली. संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी हे शिवाजी महाराजांवर वार करणाऱ्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याचा वंशज असल्याचा संशय त्यांच्या वर्तनावरून येत आहे, ते मनोरुग्ण आणि विकृत आहेत, अशी टीका डॉ.कुमार सप्तर्षी यांनी केली आहे.

महात्मा गांधी हे राष्ट्रपिता म्हणून आदरणीय असून त्यांची विचारसरणी संपविण्याचे कटकारस्थान सुरू आहे. या मागे देवेंद्र फडणवीस आणि संघ आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंगे पेटविण्यासाठी तयारी असून वादग्रस्त वक्तव्ये करून वातावरण गढुळ केले जात आहे, असे डॉ. सप्तर्षी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये