पुणे शहर

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्रीपाद बेदरकर यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार संघटनेच्या अध्यक्षपदी सीएमए श्रीपाद बेदरकर, तर उपाध्यक्षपदी ॲड. अमोल शहा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या ‘ज्ञानमंदिर’ सभागृहात नुकत्याच झालेल्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२२-२३ या वर्षीच्या नवी कार्यकारिणी घोषित करण्यात आली. खजिनदारपदी ज्ञानेश्वर नरवडे, सचिवपदी प्रसाद देशपांडे आणि सहसचिवपदी ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड झाली.

यावेळी संघटनेचे मावळते अध्यक्ष मनोज चितळीकर, माजी अध्यक्ष बी. एम. शर्मा, सीए सुनिल भांडवलकर, ॲड. व्हि. जी. शहा, नरेंद्र सोनवणे, अॅड. दिपक गोडसे शरद सूर्यवंशी, विलास आहेरकर आदी मान्यवर उपस्थित होते. माजी अध्यक्ष ॲड. मिलिंद भोंडे, संतोष शर्मा, ‘जीएसटी’ प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष सुनील खुशलानी आणि नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष अनिल चव्हाण यांना कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांगली येथील कर सल्लागार ॲड. अमोल माने यांना सन २०२१-२२ या वर्षाचा ‘सुपरस्टार अवार्ड’ने सन्मानित करण्यात आले.

Img 20220610 wa0330

कर सल्लागार संघटना आपल्या कार्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. दोन हजाराहून अधिक मान्यवर सभासद आहेत. संस्थेकडून सर्व कर सल्लागार, सनदी लेखापाल आदींना कर रचनेतील विविध बदल याबाबत मार्गदर्शन करण्याबरोबरच, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांबाबत सरकारच्या विविध योजनांचा प्रसार केला जातो. संघटनेचे हे कार्य नेटाने पुढे नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे श्रीपाद बेदरकर यांनी नमूद केले.

Img 20220621 wa00078738131563619319629

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये