सिंहगड रस्त्यावर औषधफवारणीच्या कामास सुरूवात

पुणे : कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव त्याचप्रमाणे पावसाळ्याचे दिवस असल्याने होणारे डेंग्यू, मलेरिया या सांसर्गिक आजार रोखण्यासाठी प्रभाग क्र.३४ मधील सिंहगड रोड परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नगरसेवक प्रसन्न जगताप यांच्या वॉर्ड स्तरीय निधीतून संपूर्ण परिसरातील सर्व बिल्डिंग, फ्लॅट, वस्ती, बंगलो याठिकाणी औषध फवारणी करण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे.
साधारणतः दोन महिने हे औषध फवारणीचे काम चालणार आहे. या कामाचे उद्घाटन सिंहगड रस्ता क्षेत्रिय कार्यालयाचे अधिकारी संभाजी खोत यांनी श्रीफळ वाढवून केले.
याप्रसंगी खडकवासला मंडल अधिकारी विकास पाटील , आरोग्य निरीक्षक संतोष भाईक, केतन निकम, सुनिल मोहिते, निखिल दिवसे तसेच अनिल भिसे, आकाश जाधव, किशोर कुलकर्णी, सुरेश देशमुख, लक्ष्मणराव शिंदे, राहुल जोशी उपस्थित होते.



