पुणे शहर

लावणी कलावंतांना कार्यक्रमासाठी सर्वतोपरी मदत करणार – चंद्रकांत पाटील

क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून भाऊबीजेनिमित्त साडी भेट

पुणे : pune city कोरोनाच्या संकटाचा ज्या ज्या घटकांना फटका बसला अश्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या व्यवसायात पुन्हा उभे राहण्यास मदत करण्याचे धोरण मी व भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांनी अवलंबिले असून त्याच धर्तीवर लावणी कलावंतांना कार्यक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.

भाऊबीजेनिमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे लावणी कलावंत भगिनींना साडी भेट देण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, फाउंडेशनच्या विश्वस्त शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, शो संयोजक सत्यजित धांडेकर, नगरसेविका हर्षाली माथवड, वासंती जाधव, वृषली चौधरी, स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर, भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, सरचिटणीस दिनेश माथवड, नवनाथ जाधव, दीपक पवार, युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ आदी उपस्थित होते.

Whatsapp image 2021 11 08 at 12. 19. 57 pm 1

चंद्रकांत पाटील म्हणाले की ” कोरोना काळात रोजगार बुडाल्याने पुन्हा उभे राहताना जे भांडवल लागते ते पुरविण्याचा आम्ही निर्णय केला आणि त्यासाठी रिक्षा चालक यांना सी एन जी कुपन, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांच्या खात्यात दरमहा ठराविक रक्कम, बचत गटाने तयार केलेल्या वस्तू विकत घेण्याचा उपक्रम, महिलांना शिलाई मशीन भेट देऊन त्यांना कपडे  शिवण्याचे काम देखील दिले असे सांगतानाच, त्याच धर्तीवर लावणी कलावंतांना त्यांचा शो सुरु करण्यासाठी सर्वतोपरी मदत करताना एका शोची सर्व तिकिटे आम्ही खरेदी करू व मानधन देखील देऊ, त्या माध्यमातून त्यांचे पुढील शोसाठी चे भांडवल उभे राहिल असे वचन दिले.

Fb img 1635744703565

पुरुष असूनही स्त्री वेषातली लावणी सादर करणारे फिरोज मुजावर यांना यावेळी विशेष सन्मानित करण्यात आले. माझ्या फाउंडेशन च्या वतीने नवरात्र, गणेशोत्सव, शिवजयंती सोहोळा साजरा केला जातो, त्यात दरवर्षी दर्जेदार लावणीचे कार्यक्रम केले जातात, मात्र गत दोन वर्षात हे कार्यक्रम झाले नाहीत म्हणून लावणी कलावंतांना भाऊबीज निमित्त भेट देण्याचा उपक्रम राबविल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले.

Img 20211108 wa0067

यावेळी लावणी कलावंत तेजस्विनी लोकरे,स्वाती धोकटे,शीतल चोपडे, शबनम महिमकर, पूजा नाईक, शिल्पा भवार, निकिता शाह, उषा करंबळेकर, सीमा पटेल, दीपा मातवड, रुपाली लोंढे, माधवी गवंडे इ भगिनींना साडी भेट देण्यात आली. मला भाऊ नाहीये त्यामुळे आज आमदार चंद्रकांत पाटील आणि संदीप खर्डेकर यांनी जी भाऊबीज भेट दिली ती कायम स्मरणात राहील असे नृत्यांगना तेजस्विनी लोकरे म्हणाल्या.कार्यक्रमाचे संयोजन नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व सत्यजित धांडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन व प्रास्ताविक संदीप खर्डेकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये