विज्ञान दिनानिमित्ताने मामासाहेब मोहोळ विद्यालयात व्यवसाय अभ्यासक्रम विभागाच्या वतीने व्याख्यान

“प्रतिकूल परिस्थितीत आत्मविश्वास कामी येतो- प्रा. भगवान पांडेकर”
कोथरुड : “प्रतिकूल परिस्थितीत आत्मविश्वास कामी येत असून शून्यातून विश्व निर्माण करणारे शास्त्रज्ञ आज भारतात आहेत. तर अनेकांनी आपल्या बुद्धी चातुर्यावर देशासह विदेशात संशोधन केलेले आहे असे मार्गदर्शन प्रा. भगवान पांडेकर यांनी केले. Lecture on behalf of Business Courses Department at Mamasaheb Mohol Vidyalaya on the occasion of Science Day

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, पौड रोड , पुणे व्यवसाय अभ्यासक्रम विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्ताने ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पांडेकर बोलत होते. या प्रसंगी प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, प्रा. विभागप्रमुख शिंदे ए. डी., व महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालचे प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे आपल्या मनोगतात म्हणाले “व्यवसाय अभ्यासक्रम विभागाकडून व्याख्यान प्रकल्प दिनविशेष कार्यक्रम घेण्यात येतात. हे विद्यार्थी नोकरी मागणारे नसून नोकरी देणारे असतात. किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रमात मिळालेले तांत्रिक ज्ञान स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास खूप उपयोगी पडते देशाच्या पायाभूत उभारणीस या विभागाकडील विद्यार्थी कार्यरत असतात याच बरोबर इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांचा पाया हा विज्ञानातून आलेला असल्याने विज्ञान दिवसाचे महत्व असल्याचे मत व्यक्त केले”.



कायक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. शिंदे ए.डी. यांनी केले प्राध्यापिका इप्पकायल यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमासाठी ९० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.मोरे, प्रा. सावंत यांनी योगदान दिले. प्राध्यापिका अनिता तारू यांनी कार्यक्रम समन्वयक व प्रा. सुतार यांनी कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहिले.



