पुणे शहर

पर्यावरणासाठी आपण एकत्र लढूया ; वाढदिवसानिमित्त स्वप्नील दुधाने यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद..

आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने यांचा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमांनी व पर्यावरण संवर्धनाचा हेतू डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आला. मागच्या वाढदिवसादिवशी त्यांनी पुष्गुच्छ, फुलांऐवजी पुस्तक भेट द्या आवाहन केले होते व यातून एक पुस्तक घर उभे राहिले. तर यावेळी त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी भेट म्हणून झांडांची रोपे देण्याचे आवाहन केले होते व त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. Let’s fight together for the environment;  Citizens respond to the call made by Swapnil Dudhane on the occasion of his birthday.

नागरिकांनी या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत आपल्याला तब्बल २५० ते ३०० रोपटी भेटस्वरूपात दिली. या उपक्रमामुळे पर्यावरण बचावासाठी आम्ही खारीचा वाटा उचलला असून हा उपक्रम निव्वळ आपल्या सर्वांच्या साथीने यशस्वी होऊ शकला असल्याचे स्वप्नील दुधाने यांनी म्हंटले आहे.

तसेच वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा ६५० नागरिकांनी लाभ घेतला. या उपक्रमांतर्गत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप, हृदयरोग तपासणी, हाडे व सांधे तपासणी, हिमोग्लोबिन व ECG तपासणी, रक्त व शुगर तपासणी, मोतीबिंदू तपासणी, पाईल्स, फिशर व हर्निया तपासणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यावेळी २.५ लाखांचा मोफत अपघाती विमा  नागरिकांना देण्यात आला. तब्बल ३५० नागरिकांना या प्रसंगी मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

Whatsapp image 2021 11 23 at 2. 46. 54 pm

या प्रसंगी करार करण्यात आलेल्या पॅथॉलॉजी लॅब कडून तपासणीवेळी लाभार्थी नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्यात आले.  भविष्यात या लॅबमध्ये या नागरिकांना हे कार्ड दाखवून तब्बल ४०% सवलतीच्या दरात कोणतीही टेस्ट करता येणार आहे. 

तसेच स्वप्नील दुधाने यांच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद भगत व मित्र परिवार यांनी आयोजित केलेल्या महारक्तदान यज्ञ या रक्तदान शिबिरात १५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये