Maharashtra Budget 2022 : सीएनजी स्वस्त; जाणून घ्या अर्थसंकल्पातल्या महत्त्वाच्या गोष्टी

मुंबई : सीएनजी तसेच पीएनजीवरील मूल्यवर्धित कर कमी करण्याची सरकारने घोषणा केली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्य सरकारकडून विकासाची पंचसूत्री हा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची घोषणा पवार यांनी केली. या पंचसूत्रीअंतर्गत येणाऱ्या कृषी,आरोग्य,मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित असल्याची माहिती दिली.
अर्थसंकल्पाच्या निमित्ताने मुख्य घोषणांविषयी जाणून घ्या…
पर्यावरण पूरक नैसर्गिक वायूचा घरगुती वापर होतो, CNG वर चालणाऱ्या वाहनांना फायदा होतो. मूल्यवर्धित कर VAT चा दर हा 13.5 टक्क्यांवरून टक्के वरून 3 टक्के करायचा प्रस्ताव आहे. यामुळे 800 कोटी महसुली घट होईल, असं अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.
शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिंनीसाठी मोफत सॅनिटरी नॅपकीन डिस्पेन्सिंग मशिन
मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत रोजगाराच्या 3 लाख 30 हजार नवीन संधी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 1 लाख रोजगाराच्या नव्या संधी
मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या निवासाची तात्पुरती सोय व्हावी यासाठी नवी मुंबई इथं महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
करोनामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी पंडिता रमाबाई महिला उद्योजक योजनेची घोषणा, या महिलांना स्वयंरोजगरासाठी भांडवल उपलब्ध करून देणार
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 3000 नवीन बसगाड्या व 103 बसस्थानकांच्या आधुनिकीकरण यासाठी भांडवली अर्थसहाय्य
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी 100 कोटींचा निधी देणार
आरोग्य सेवांवर येत्या 3 वर्षांत 11 हजार कोटी खर्च करण्याचं सरकारचं नियोजन आहे. शासकीय ट्रॉमा केअर युनिट्स स्थापन करण्यासाठी 100 कोटी रुपये आणि आवर्ती खर्चासाठी 18 कोटींचा निधी. टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरला आयुर्वेदिक संशोधन केंद्रासाठी 10 हेक्टर जमीन देण्यात येईल.
पदव्युत्तर अभ्यासक्रमात आधुनिक तंत्रात फिजिओथेरपी तंत्राचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे




