पुणे शहर

लसीचे राजकारण थांबवा; अन्यथा सीरममधून लस बाहेर पडू देणार नाही- शिवसेनेचा इशारा

पुणे : कोरोना लसीचे नसून महाराष्ट्राला कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राजकारण थांबवा. आमचा उद्देश सीरम इन्स्टिट्यूटमधून राज्याला जास्त लस मिळावी हा आहे, असे स्पष्ट केले आहे. अन्यथा लस बाहेर पडू देणार नाही, असा इशारा पुणे शहर शिवसेनेच्यावतीने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना दिला आहे.Stop the politics of vaccines; Otherwise, the vaccine will not be released from the serum – Shiv Sena’s warning

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाची रूग्ण संख्या आहे अशा वेळी आपण महाराष्ट्राला जाणीवपूर्वक कमीआहे. कमी प्रमाणात लस देऊन राज्य सरकारला म्हणजेच महाराष्ट्राच्या जनतेला वेठीला धरत आहात.पुणे शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख श्याम देशपांडे, प्रशांत बधे, जिल्हाप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांनी हा इशारा दिला आहे.

Img 20210223 wa0156

केंद्र शासनाने भाजपप्रणीत राज्यांना मोठ्या प्रमाणात लस देणे आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन जाणीवपूर्वक महाराष्ट्राला कमी प्रमाणात लस देणे, हे महाराष्ट्रातील जनतेच्या जिवाशी तुम्ही खेळत आहात,असे पत्र आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना याबाबत पत्र दिले आहे.

पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविशिल्ड लस तयार होतेय.असे पत्रात नमूद केले आहे.महाराष्ट्राला जर तुम्ही लस येत्या आठ दिवसांमध्ये वाढवून दिली नाही, तर आपल्या जनतेला वाऱ्यावर सोडून शत्रूराष्ट्र आम्ही ही लस पाकिस्तानला लस देणे यात तुमचं बेगडी हिंदुत्व दिसून यामागे येतंय. देशातल्या रुग्णांपेक्षा पाकिस्तान तुम्हाला जवळचा आणि इतर राज्यांमधील नागरिकांना लस मिळू नये, हा उद्देश वाटतोय का? अशी विचारणा केली आहे. त त्यामूळे आपण तातडीने लसीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करावा. अन्यथा आम्ही पुण्याबाहेर लस जाऊ देणार नाही, याची नोंद घ्यावी. असा इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Img 20210408 wa0012

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये