पुणे शहर

पुण्यात इमारतीवर वीज पडली. घटना कॅमेरात कैद पाहा व्हिडिओ…

पुणे : पावसात काही ठिकाणी आकाशातून विज पडण्याच्या देखील घटना घडल्या आहेत. अशीच एक वीज पडताना ची घटना पुण्यातील दौंड तालुक्यातील एका व्यक्तीने आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केली आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

काल दुपारपासूनच दौंड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर ढग दाटून आले होते आणि अचानक विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर वाढत असतानाच शहरातील लिंगाळी रोडवर असणाऱ्या बर्फ फॅक्टरी बिल्डिंगवर बॉम्ब हल्ला व्हावा तशी कडकडाटात वीज येऊन आदळली. यावेळी पाऊस आणि विजांचे व्हिडीओ बनविणाऱ्या एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये हे सर्व चित्रित झाले आणि पाहता पाहता हा व्हिडीओ अनेक ठिकाणी व्हायरल झाला.

Img 20211005 wa0014

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये