पुणे शहर

सुस-बाणेर-पाषाण प्रभागातील मिसिंग लिंकबाबत स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर, बाबूराव चांदेरे, नगरसेविका रोहिणी चिमटे यांची अधिकाऱ्यांसह पाहणी 

पुणे : अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पाषाण येथील सोमेश्वर मंदिरापासून, बाणेर बालेवाडी प्रभाग येथे प्रभागातील महानगरपालिका नगरसेवक अमोल बालवडकर, बाबूराव चांदेरे, नगरसेविका रोहिणी चिमटे यांचे समवेत संयुक्त जागा पाहणी केली.  

नुकतीच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, चंद्रकांतदादा पाटील, यांच्या अध्यक्षतेखाली सुस-बाणेर-पाषाण प्रभागातील मिसिंग लिंकबाबत मा. महापालिका आयुक्त व अन्य अधिकारी यांचे समवेत बैठक झाली. सदर बैठकीत झालेल्या चर्चेस अनुसरून ही पाहणी करण्यात आली.

Img 20251125 wa01788344877527023851533

नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले, रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती, भूसंपादन व तांत्रिक अडचणी, तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या वाहतूक समस्यांचा सखोल आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

ही महत्त्वाची मिसिंग लिंक पूर्ण झाल्यानंतर पाषाण, सुतारवाडी, बाणेर व बालेवाडी परिसरातील वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा वेळ व इंधन दोन्हीची बचत होईल. तसेच नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक आणि आपत्कालीन सेवांना याचा मोठा फायदा होणार आहे.

परिसराचा नियोजनबद्ध व सर्वांगीण विकास साधण्यासाठी, नागरिकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देत अशी विकासकामे गतीने पूर्ण व्हावीत, यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सुरक्षित, सुसज्ज आणि ट्रॅफिकमुक्त परिसर घडविण्याचा संकल्प यामागे असून, येत्या काळातही विकासाची ही गती कायम ठेवली जाईल अशी ग्वाही अमोल बालवडकर यांनी दिली आहे.

कस्पटेवस्ती येथील पुणे व वाकड भागाला जोडणाऱ्या पुलाजवळील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची तसेच उर्वरीत आवश्यक जागेची पाहणी केली तसेच सोमेश्वर मंदिरामागील डीपी रस्ते व अन्य मीसिंग लिंकच्या जागांची पाहणी करून त्या व्यतिरिक्त बालेवाडी येथील सुस नांदे रस्त्यावरील सनीज वर्ल्ड येथील खिंडीच्या रुंदीकरणाच्या कामाचीही पाहणी करण्यात आली.

यावेळी संबंधित जागा मालक यांना तडजोडीने एफ.एस.आय. किंवा टी.डी.आर. मोबदल्यात जागा त्वरित मनपाचे ताब्यात देणेबाबत विनंती करण्यात आली. भूसंपादन आणि कोर्ट केसेस याबाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी यावेळी माहिती घेतली असून त्याबाबत तातडीने चर्चा करणेबाबत पथ विभाग, बांधकाम विकास विभाग आणि भूसंपादन विभाग यांना आदेश दिले आहेत व  पुढील तीन महिन्यात महत्वाच्या मिसिंगलिंकचे रस्ते जागा ताब्यात घेऊन रस्ते करणेबाबत पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार या तिन्ही विभागांकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

सदर पाहणीदरम्यान खालील प्रमाणे अधिकारी उपस्थित होते.

नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेविका रोहिणी चिमटे,राहुल कोकाटे, पथ विभाग मुख्य अभियंता राजेश बनकर, अधिक्षक अभियंताअभिजित आंबेकर

तसेच पथ विभाग, बांधकाम विकास विभाग व भूसंपादन विभाग इत्यादी विभागाचे अभियंते व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये