कर्वेनगरमधील साई बाबा मंदिरात महाआरतीचे आयोजन, श्रीराम भक्तांकडून प्रभू श्रीरामाच्या नामाचा गजर

पुणे : अयोध्येतील प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त कर्वेनगर मधील श्री साईबाबा मंदिर ट्रस्टच्यावतीने साई बाबा मंदिरात प्रभू श्रीरामाची महाआरती करण्यात आली या प्रसंगी श्री.छत्रपती शिवाजी पुरस्कार भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार विजेत्या नीलिमा मुकुंद जोगळेकर यांचा ट्रस्ट चे खजिनदार मारूती अण्णा मोहिते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ह.भ.प.सुजाता पाटणकर यांच्या भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टिव्ही वर श्रीराम प्रतिष्ठापना लाईव्ह पाहत राम भक्तांनी भक्तीमय वातावरणात फुलांचा वर्षाव करित राम नामाचा गजर केला. याप्रसंगी अनिल देवकर, दत्ता माने, संदीप गुंजाळ, बाप्पू मेंगडे, हेमंत बोरकर, महेश जाधव, अशोक यादव, मधुकर मोहिते, फुलापगारे काका आदी उपस्थित होते.

रेल्वे सल्लागार समिती सदस्य विनोद मोहिते म्हणाले, या निमीत्ताने हिंदूंचा गेल्या 500 वर्षांचा संघर्ष संपला आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहिले आहे. हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे.












