पुणे शहर

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त वारजे माळवाडीमध्ये धार्मिक विधी व दिपोत्सव..

माजी नगरसेवक किरण बारटक्के यांच्या वतीने आयोजन

वारजे : अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वारजे माळवाडी परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राम लल्लाच्या स्वागतासाठी वारजे माळवाडीमध्ये जोरदार तयारी करण्यात आली होती. प्रभू श्रीरामांना अभिषेक, प्रभू श्रीराम पुजन, आरती, दिपोत्सव, सामुहीक राम रक्षा पठण, प्रसाद वाटप अशा  धार्मिक कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रभू श्रीरामाचा जयघोष केला. 

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वारजे नगराचे संघचालक चित्तरंजनजी भागवत यांच्या हस्ते पहीला दिवा लवण्यात आला. तसेच महीलांच्या हस्ते दिपोत्सव साजरा करण्यात आला. सामुहीक राम रक्षा पठणास मोठ्या संख्येने नागरीक व महीला भगिणी सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमांचे आयोजन माजी नगरसेवक किरण बारटक्के यांच्या वतीने करण्यात आले होते. 

Img 20230717 wa0012281298961742807603730839

या वेळी बुवासाहेब बराटे, श्रीकृष्ण बराटे, ह.भ.प नारायण महाराज गोरे, भोलाशेठ बराटे, रामभाऊ शिंदे, बाळासाहेब किंडरे, नाना काटे, महेश बराटे, बबनराव उगले, सुरेश शिगवण मान्यवर मंडळी, मित्र परिवार उपस्थित होते.

किरण बारटक्के म्हणाले, आयोध्येतील राम मंदिराचे स्वप्न साकार झाल्याने नागरीकांमध्ये असलेला आनंद कार्यक्रमातील उत्स्फूर्त प्रतिसादातून दिसून आला. अनेक वर्षांचे राम मंदिराचे स्वप्न केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने साकार झाल्याने आज राम भक्तांना आजचा आनंद सोहळा साजरा करता आला.

Img 20240123 wa00066227825121185584302
Img 20240123 wa00025384810858972965351
Img 20240123 wa00035192201532525869981
Img 20231112 wa00053541767882370111537
Img 20230511 wa0002282292969174931887579613

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये