पुणे शहर
मिठाई ,फरसाण अँड डेअरी असोसिएशन पुणेतर्फे अकरा हजार पेढे आणि श्री रामरक्षा स्तोत्र पुस्तिकेचे वितरण

पुणे : अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्र प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त मिठाई, फरसाण अँड डेअरी असोसिएशन पुणे तर्फे तुळशीबाग येथील श्री राम मंदिर येथे सकाळपासून अकरा हजार नागरीकांना प्रसाद रुपी पेढे आणि श्री रामरक्षा स्तोत्र पुस्तिकेचे वितरण करण्यात आले.तसेच कारसेवक शरद गंजीवाले,योगेश थत्ते,सुधीर पाचपोर व दिलीप नगरकर यांचा शाल व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी असोसिएशन चे अध्यक्ष संजय चितळे कार्याध्यक्ष मुरलीधर चौधरी उपाध्यक्ष केदार चितळे, सचिन गाडवे, योगेश अग्रवाल, दिलिप बुधानी,सचिव अमित अग्रवाल सहसचिव प्रशांत डाटा, मकरंद गाडवे कोषाध्यक्ष दिनेश अग्रवाल सहकोषाध्यक्ष कैलाश झंवर तसेच असोसिएशन चे सभासद अथर्व गाडवे, मोहित अग्रवाल, मंगेश अग्रवाल, राहुल अग्रवाल, हरिओम कुशवाह आदी मान्यवर उपस्थित होते












