पुणे शहर

केळेवाडी मधील विश्वशांती मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा, मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन

कोथरूड : पौड रस्त्यावरील केळेवाडी मधील विश्वशांती मंडळाच्या वतीने मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या वर्षीचा गणेशोत्सव अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडला.या वर्षी मंडळाने आकर्षक देखावा सादर केला आहे.गणेश स्थापनेची मिरवणूक भव्य काढण्यात आली होती.

दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सवाच्या काळात वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवात महिलांच्या हस्ते आरती आणि अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मंडळाचे कार्याध्यक्ष शशिकांत कोंढरे, अध्यक्ष साई मेंगडे, उपाध्यक्ष अजय मोहोळ, खजिनदार संदिप घारे, उपखजिनदार ओंकार शिंदे, शुभम मोरे, सेक्रेटरी गणेश मोहोळ, उपसेक्रेटरी राकेश घाग, उत्सव प्रमुख चंदूशेठ कदम, राजाभाऊ मगर, जीवन निढाळकर, महेंद्रशेठ गुजर, सुनिल शिंदे आहेत. गणेशविसर्जन मिरवणूक पारंपरिक व शिस्तबद्ध पध्दतीने करण्यात येणार असल्याची माहिती जीवन निढाळकर यांनी दिली आहे.

Img 20240916 wa00124225403575210873
Fb img 16474137314571819310932637888379
Img 20240404 wa00123413096165072096535
Img 20240404 wa00134916733315783821383

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये