शैक्षणिक

Maharashtra School : राज्यातील विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी रद्द; शाळा एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ

मुंबई : कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता उन्हाळी सुट्ट्या रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांपासून  शाळा बंद होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता शाळा सुरू झाल्या असून अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक देखील मागणी करत होते. त्यानुसार एप्रिल महिना आणि रविवारीही शाळा सुरु राहणार आहेत.  विद्यार्थ्यांच शालेय नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे यंदा मात्र विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त अभ्यासच करावा लागणार आहे.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये