मनसे कोथरूडमधील महाराष्ट्र सैनिकांनी महिला भगिनींना न्याय मिळवून दिला..

पुणे : शुक्रवारी कोथरूड, भुसारी कॉलनी येथील एल.एन.टी. इन्शुरन्स या कंपनी मधील काही महिला कर्मचारी मनसे कडे न्याय मागण्यासाठी आल्या. मनसे शाखा अध्यक्ष किरण उभे आणि प्रसाद गोखले यांनी सदर प्रकरणी सविस्तर माहिती घेतली. आज शनिवारी सकाळी मनसे कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सैनिकांनी संबंधीत इन्शुरन्स कंपनी मध्ये धडक दिली. आधी प्रेमात समजावून कंपनी चे मालक योगेश खवळे योग्य तो प्रतिसाद देत नाही असं दिसल्यावर महाराष्ट्र सैनिक आक्रमक झाले व मनसे स्टाईल ची आठवण करून दिल्यावे कंपनी व्यवस्थापन ताळ्यावर आले व मनसेच्या मागणी प्रमाणे त्वरित संबंधीत महिला कर्मचाऱ्यांची माफी मागत सर्व राहिलेल्या पगाराचे चेक काढण्यात आले.
न्याय फक्त इथेच मिळतो- महिलांची प्रतिक्रिया
यावेळी सर्व महिला कर्मचाऱ्यांनी मनसे चे आभार मानले.
यावेळी प्रियंका लाड म्हणाल्या की सन्मानीय राजसाहेब ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास होता ते आम्हाला न्याय मिळवून देणारा आणि तो न्याय या भाऊंनी आम्हाला मिळवून दिला.
आज या वेळी मनसे कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे यांच्यासह रमेश उभे, प्रसाद गोखले, किरण उभे,हर्षद खाडे, विराज डाकवे, अशोक मराठे, राज काळे, हनुमंत शेळके यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.







