आता पुढचा जमाना ई बाईकचा असेल : अजित पवार

पुणे : pune city, Kothrud महाराष्ट्राने ई बाईक धोरण राबवले आहे. महाराष्ट्रान कायमच नव्या गोष्टी राबविण्यात पुढाकार घेतला आहे. आता पुढचा जमाना ई – बाईकचा आहे. पूर्वी सायकलचं शहर म्हणून पुण्याची ओळख होती. मात्र आता पुणे सर्वात जास्त दुचाकीचे शहर झालं आहे. पुढील काळात ई- बाईकचे शहर म्हणून पुणे नावारूपाला आलं तर वावगं वाटायला नको, असे मत उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी व्यक्त केले.
कोथरुड मधील Ward Wizard कंपनीच्या इलेक्ट्रिक व्हेईकल या कंपनी संचालित पहिल्या Experience सेंटर आणि सर्व्हिस स्टेशनचे उद्घाटन आज अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक दीपक मानकर, राष्ट्रवादी काँग्रेस कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, करण मानकर, संचालक विजय आढाव, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यतीन गुप्ते, व्हाईस प्रेसिडेंट शशांक कुलकर्णी, शीतल भालेराव, प्रेसिडेंट सुनील चाको, आदी उपस्थित होते.
पुणेरी ग्राहक हा चौकस बुद्धीचा आहे. कितीही प्रश्न विचारेलत तरी शांतपणे त्याच्याशी बोला. लोकांना पटायला थोडा वेळ लागतो. पण एकदा मनात बसले की पसरायला वेळ लागत नाही, असा सल्ला ही पवार यांनी यावेळी दिला.







