पुणे शहर

वारजेत स्वच्छता कर्मचाऱ्यांचा ‘स्वराज्य स्वच्छता सैनिक कृतज्ञता सन्मान’ देऊन गौरव

भारतभूषण शरदआबा बराटे मित्र परिवाराच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

वारजे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वराज्य स्वच्छता सैनिक कृतज्ञता सन्मान’ देऊन भारतभूषण शरदआबा बराटे मित्र परिवाराच्या वतीने गौरवण्यात आले. Sanitation staff honored by honoring ‘Swarajya Swachhta Sainik Gratitude’

उपस्थित सर्व महिला, पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांना भगवे फेटे घालून सन्मान पत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. माजी उपमहापौर, नगरसेवक दिलीप बराटे व भारतभूषण शरदआबा बराटे यांच्या वतीने या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य स्वच्छता सैनिक कृतज्ञता सन्मान पुरस्कार मिळाल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

भारतभूषण बराटे म्हणाले की, समाजाचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी कर्तव्यनिष्ठ राहून परिसर स्वच्छ व आरोग्यपूर्ण ठेवणारे आपले स्वच्छता कर्मचारी बांधव हे खऱ्या अर्थाने सुराज्याचा पाया आहेत. कारण स्वच्छता राहिली तरच समाजाचे आरोग्य उत्तम राहील आणि सुदृढ समाज प्रगती करू शकेल. शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर त्यांच्या या समर्पणाबद्दल स्वराज्याचे स्वच्छता सैनिक कृतज्ञता सन्मान देऊन कृतज्ञता व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले

Img 20210219 wa0013

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये