पुणे शहर

कोथरूड मधील २१ मिसिंग लिंक रस्त्यांचा मोठा प्रश्न मार्गी लावा उज्वल केसकर यांची पुणे महापालिका आयुक्तांकडे मागणी 

पुणे : कोथरूड मधील मिसिंग लिंक रस्त्यांचा मोठा प्रश्न मार्गी लावा अशी मागणी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांची पुणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे. केसकर यांनी कोथरूड भागातील 21 मिसिंग लिंक ची यादी महापालिका आयुक्तांना निवेदन व्दारे दिली आहे.

केसकर म्हणाले, कोथरूड भागातील मिसिंग लिंक रस्त्यांची कामे  जर व्यवस्थित झाली तर कोथरूड मधला मोठा प्रश्न मार्गी लागेल. या भागातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी या रस्त्यांचा प्रश्न पुणे महापालिकेने तातडीने मार्गी लावला पाहिजे.

Img 20240404 wa0016281291197243699799508498

कोथरूड मधील हे आहेत मिसींग लिंक 

महात्मा सोसायटी गल्ली नंबर आठ ते नाल्या वरचा छोटा पूल पंधरा मीटर रुंदीचा हा रस्ता आहे आणि या ठिकाणी दहा मीटर एवढा कमी अंतर जोडलं तर एक मोठा रस्ता व्यवस्थित वापरता येतो. 

पौड रोडवरील कर्वे रस्त्याला मिळणाऱ्या चितळे बंधू दुकानापाशी 20 मीटर लांबीची पट्टी केली तर हा रस्ता नीट वापरता येतो. 

Img 20240404 wa0012281298841886320058264868

आयडियल कॉलनी च्या रस्त्यावर एक टॉयलेट आहे, त्यामुळे तो रस्ता नीट होतच नाही, कर्वे पुतळा पेट्रोल पंप ते आयडियल कॉलनी 30 मीटर, गुजरात कॉलनी गोल्डन बेकरी ते वनाज कंपनी 48 मीटर, आंबेडकर चौक व्हाया तिरुपती नगर 200 मीटर, किनारा हॉटेल ते पेठकर साम्राज्य रोड 54 मीटर, आयडियल कॉलनी ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह 54 मीटर, वनाज मेट्रो यार्ड ते गुरुकृपा सोसायटी 68 मीटर, कर्वे रोड कॅनॉल चा रस्ता कमिन्स फॅक्टरी पर्यंत 90 मीटर, दुधाने लॉन्स ते राजाराम पुल 180 मीटर, एकलव्य कॉलेज ते हायवे 70 मीटर, आंबेडकर चौक  कमिन्स फॅक्टरी ते बॅरोमीटर 152 मीटर,  भुजबळ बाग ते गुलमोहर रोड १५०, मीटर कोकण एक्सप्रेस ते पिना गार्डन 180 मीटर, नवीन शिवणे गोसावी वस्ती रोड तीनशे मीटर,  नऊशा मारुती ते कर्वेनगर 150 मीटर, ठाकरे पथ ते आंबेडकर चौक मिलेनियम हायस्कूल 1700 मीट, बालभारती पौड1800 मीटर 

Img 20240404 wa0013281291032765212350995267

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये