महाराष्ट्र

जालन्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण

जालना : अंतरवाली सराटी गावात मराठा आक्रोश मोर्चाचं आरक्षणासाठी उपोषण सुरू असताना आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यानंतर तिथून चार किलोमीटर अंतरावर आंदोलकांनी दोन बस पेटवल्या आहेत. तसेच काही वाहनांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला. एक खासगी आणि राज्य परिवहन महामंडळाची एक बस आंदोलकांनी पेटवली. आंदोलकांकडून झालेल्या दगडफेकीत १० ते १२ पोलिस जखमी झाले आहेत.

Img 20230511 wa0002282295271751229740402775

“मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणारं सरकार आम्हाला नको”, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे.

Img 20230717 wa0012281291948762095496285435

Img 20221228 wa0001282294128958397815578022

गेल्या २९ ऑगस्टपासून मराठा मार्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. पण त्याला विरोध झाल्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. तर आंदोलकांनी दगडफेक केली गेली. त्यानंतर आक्रमक आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. पोलिसांनी काल रात्रीच आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो हाणून पाडण्यात आला होता.

Img 20230812 wa0001281297517832967883010071

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये