महाराष्ट्र

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू व्हावी.आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विधानसभेत मागणी

मुंबई : राज्य सरकारने महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्धारे (पॉइंट ऑफ इन्फर्मेशन) केली.

वैद्यकीय शाखेतील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी घेतलेल्या ‘नीट २०२३’ परीक्षेचा निकाल जाहीर होऊन महिना उलटला असून, महाराष्ट्रामध्ये अद्याप प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढलेली आहे याकडे आमदार शिरोळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

Img 20221228 wa00016208176808646242256

देशातील इतर राज्यांमध्ये प्रवेशप्रक्रियेने गती घेतली असून, अनेक ठिकाणी अर्ज प्रक्रिया पूर्णत्वाकडे देखील गेलेली आहे. गुजरातमध्ये अर्जासाठी २४ जुलै, कर्नाटकला २१ जुलै, पंजाबला २१ जुलै, अरुणाचल प्रदेश येथे १८ जुलै आणि तमिळनाडू येथे अर्जाची मुदत १० जुलै अशी ठेवण्यात आली, अशी माहितीही आमदार शिरोळे यांनी सभागृहासमोर ठेवली.

Img 20230707 wa00097391429386569165714
Img 20230708 wa0003
Img 20230511 wa0002281296351682306326034196

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये