पुणे शहर

पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने विविध मागण्यांसाठी पुणे महापालिका आयुक्तांची भेट – राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर  

पुणे : पुणे शहरातील सध्यस्थितीत सुरु असलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करणे, प्रभागातील मुलभूत सुविधा जसे पाणी पुरवठा, सार्वजनिक शौचालय,ड्रेनेज, पावसाळी लाईन दुरुस्ती करणे,  नागरिकांचे विविध प्रश्न या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट घेत विस्तृत चर्चा करत निवेदन दिले. याप्रसंगी आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबधित विभाग प्रमुखांना कामे मार्गी लावण्याबाबत सूचना केल्या.

दीपक मानकर म्हणाले, पुणे महानगरपालिकेच्या वतीने पुणे विविध ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. तसेच अनेक प्रभागात पाणीपुरवठा, सार्वजनिक शौचालय, ड्रेनेज, पावसाळी वाहिनी दुरुस्ती अशी कामे सुरू आहेत. मात्र काही ठिकाणी ही कामे संथ गतीने होताना दिसत आहे. याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबतीत महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा करित निवेदन दिले आहे. यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभाग प्रमुखांना कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी सूचना केल्या आहेत. असे मानकर म्हणाले.

Img 20250313 wa0167281296960987600208733776
Img 20250310 wa02324095435649637866308
Img 20250310 wa02282851203640248970727

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये