पुणे शहर

इतिहासातील अतुलनीय पराक्रमाच्या गोष्टीने अंगावर उमटला शहारा..’गोष्ट इथे संपत नाही ‘पन्हाळा ते पावनखिंड ! कार्यक्रमाने कोथरूडकर भारावले.

कोथरूड : स्तब्ध शांतता आणि इतिहासातील अतुलनीय पराक्रमाच्या गोष्टीने अंगावर उमटत जाणारा शहारा.. गोष्ट तशी सर्वांना माहीत पण ज्या पद्धतीने ती सादर होत होती त्यातून क्षणोक्षणी निर्माण होत होता तो त्या पराक्रमाला सलाम करण्याचा भाव..’गोष्ट इथे संपत नाही’ पन्हाळा ते पावनखिंड ! या कार्यक्रमात उपस्थित लहानांपासून थोरांपर्यंत सर्वचजण भारावून गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने परिसर दणाणून गेला. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्रीमान योगी प्रतिष्ठानच्या वतीने कोथरूडमध्ये शिवमहोत्सव २०२५ सुरू आहे. या शिवमहोत्सवामध्ये  दुसऱ्या दिवशी सध्या सर्वत्र गाजत असलेले ‘गोष्ट इथे संपत नाही’ पन्हाळा ते पावनखिंड ! या कार्यक्रमाचे सारंग भोईरकर व सारंग मांडके यांनी सादरीकरण केले. श्रीमान योगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले आहे. पालक आपल्या मुलांना घेऊन आवर्जून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोथरूड मधील थोरात उद्यानात हा कार्यक्रम पार पडला.

Img 20250317 wa0220600241035189545913 1

कोसळणाऱ्या पावसाची ती काळरात्र… लाखांच्या पोशिंद्याला सहीसलामत विशाळगडावर पोहचवण्याचा उचलला विडा  आणि म्हणूनच प्राणपणाने लढलेल्या धैर्यवान आणि महाप्रतापी बाजीप्रभू व बांदल मावळ्यांच्या अतुलनीय पराक्रमाची गोष्ट सादर होत असताना तो इतिहासातील पराक्रम आपल्या डोळ्यासमोर घडत असल्याचा भास सर्वांना झाला. या पराक्रमाचे अनेक पैलू उलगडत असताना उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकत होता. यावेळी  लहान मुले मन लावून गोष्ट ऐकताना पहायला मिळाली. कार्यक्रम संपताच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने परिसर दणाणून गेला.

दुष्यंत मोहोळ यांनी शिवजयंतीनिमित्त एका चांगला कार्यक्रम दाखवला आणि लहान मुलांना यातून नक्कीच प्रेरणा मिळेल असे भाव  व्यक्त करत उपस्थित कोथरूडकारांनी दुष्यंत मोहोळ यांचे कौतुक व आभार मानले.

Img 20250317 wa01774487116801246993312 1
Img 20250317 wa02084107133491150929044 1
Img 20250317 wa01831270769697818766628
Img 20250313 wa0167281296960987600208733776
Img 20250310 wa02324095435649637866308
Img 20250310 wa02282851203640248970727

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये