पुणे शहर

प्रस्थापितांना धक्का…वस्ती मध्ये राहणाऱ्या बहुजन कार्यकर्त्याचा विजय पक्का – विजय डाकले


पुणे : प्रस्थापित राजकारण्यांना धक्का देऊन वस्ती मध्ये राहणाऱ्या बहुजन कार्यकर्त्याला कोथरूडकर नागरिक मोठ्या मताधिक्याने विजयी करतील. लोकांना कामाचा आपला माणूस हवाय त्यामुळे लोक मला निवडून देतील असा विश्वास अपक्ष उमेदवार विजय डाकले यांनी व्यक्त केला आहे.

कोथरूड मतदार संघातील पौड रस्त्यावरील हनुमाननगर, केळेवाडी या भागात विजय डाकले यांनी प्रचार फेरी काढत नागरिकांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. डाकले म्हणाले, गेल्या काही वर्षांत कोथरूड मधील विकास कामे ठप्प आहेत. लोकांना वाहतूक कोंडी सारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत.

Img 20241020 wa0001435697684176070576


मी वस्ती भागात राहणारा साधा कार्यकर्ता गेल्या 25 -30 वर्षांपासून सामजिक क्षेत्रात काम करत आहे. लोकांच्या अडी अडचणीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. मला कोथरूड मतदार संघातील प्रश्न माहिती आहेत. आणि ते सोडविण्याची पद्धत देखील माहिती आहे. आणि सर्वात महत्त्वाचे लोकांचा माझ्यावर विश्वास आहे.त्यामुळे मी निश्चित विजयी होईल. असे डाकले म्हणाले.

Img 20240404 wa0016281297658999536660438617
Img 20240404 wa0013281298602993728148316202

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये