पुणे शहर

पुण्यात पोटच्या मुलाला 2 वर्षे 22 श्वानांसोबत कोंडून ठेवल्याची घटना उघड

पुणे : पुण्यातील कोंढवा (Kondhawa) परिसरात आई-वडिलांनीच (Parents) पोटच्या 11 वर्षांच्या मुलाला दोन वर्ष 22 श्वानासोबत (Dog) कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, दोन वर्षानंतर ज्यावेळी हा पीडित मुलगा बाहेर आल्यानंतर श्वानाप्रमाणे वागू लागला आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या आई-वडिलांना पोलिसांनी अटक केली असून, पीडित मुलाला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

पीडित मुलगा आणि त्याचे पालक कोंढव्यातल्या कृष्णाई बिल्डिंगमधल्या वन बीएचके अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्याच घरामध्ये 22 श्वानदेखील होती. कित्येक दिवसांपासून पीडित लहान मुलगा श्वानांच्या सहवासात राहत होता. त्यामुळे त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. तसेच त्याचे वागणेदेखील श्वानांप्रमाणे झाले आहे. 

पीडित लहान मुलाची घरातून सुटका करणं कठीण काम होतं. कारण खोलीतील सर्व श्वान भटकी होती. त्यांची नसबंदीदेखील झालेली नव्हती. हे श्वास हिस्त्र रुप धारण करण्याची भीती होती. ज्यावेळी आम्ही मुलाची सुटका करण्यासाठी गेलो. त्यावेळी श्वानांनी सर्व खोलीमध्ये घाण केलेली होती. मुलाच्या पालकांनी श्वानांना घरात ठेवण्याची परवानगी घेतली होती का, याचा तपासदेखील केला जाणार आहे, अशी माहिती कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले.

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये