रेल्वे प्रवास महागणार; हे आहे कारण

नवी दिल्ली : रेल्वे प्रवास आता महागणार आहे. रेल्वे स्थानकांच्या कामांसाठी लागणारा निधी आता तिकिटांवर अतिरिक्त पैसे आकारुन उभारला जाणार आहे. प्रत्येक प्रवाशाकडून तो कोणत्या श्रेणीने प्रवास करत आहे यानुसार ही रक्कम किती आकारली जाणार आहे. वेगवेगळ्या श्रेणीमध्ये प्रवास करणाऱ्यांना प्रत्येक तिकीटामागे 10 ते 50 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. उपनगरीय रेल्वेला कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
आरक्षण न केलेले प्रवासी
साधारण ट्रेन (सेकेण्ड क्लास) – 10 रुपये
मेल/एक्सप्रेस ट्रेन (सेकेण्ड क्लास) – 10 रुपये
फर्स्ट क्लास – 10 रुपये
एसी एमईएमयू/डीईएमयू – 10 रुपये
आरक्षण केलेले मात्र नॉन एसी
सेकेण्ड क्लास – 25 रुपये
स्लीपर क्लास साधारण – 25 रुपये
स्लीपर क्लास (मेल किंवा एक्सप्रेस) – 25 रुपये
फर्स्ट क्लास – 25 रुपये
आरक्षण केलेले एसी क्लास
एसी चेअर क्लास 50 रुपये
एसी थ्री टीयर/ थ्री एसी इकनॉमी क्लास 50 रुपये
एसी टू टीयर 50 रुपये
एसी फर्स्ट क्लास/ईसी/ईए/एसी विस्टाडोम 50 रुपये













