आमदार विनायक मेटे यांचा वाढदिवस शिवसंग्राम संघटनेच्या वतीने पुणे शहरात विविध उपक्रमांनी साजरा

पुणे : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांचा वाढदिवस शिवसंग्राम संघटना पुणे शहराच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. MLA Vinayak Mete’s birthday was celebrated in Pune with various activities on behalf of Shiv Sangram Sanghatana
वाढदिवसानिमित्त कर्वेनगर येथील वनदेवी टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कोरोना संसर्गा पासून बचाव करण्यासाठी सामान्य नागरिकांना N19 मास्क वाटप करण्यात आले. याचबरोबर कोथरूड विधानसभा मतदार संघातील रिक्षावाल्या काकांना मास्क वाटप, मातोश्री वृद्धाआश्रम या ठिकाणी खाऊ वाटप, कोथरूड मतदार संघामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी घरापासून लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी मोफत रिक्षा सेवा असे उपक्रम राबवण्यात आले.
खडकवासला मतदार संघातील कोंढवे या ठिकाणी असणारे श्रावस्ती या विशेष मुलांच्या संस्थेत फळ वाटप आणि अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी पुणे शहर अध्यक्ष भरत लगड, सामाजिक न्यायविभाग प्रदेश उपाध्यक्ष कल्याण अडागळे, चेतन भालेकर, उपाध्यक्ष भरत फाटक, महिला अध्यक्षा कालिंदी गोडांबे, सामजिक न्याय विभाग पुणे शहर अध्यक्ष विनोद शिंदे, उपाध्यक्ष अजिंक्य राजपूरे, खडकवासला महिला अध्यक्षा हेमा पायगुडे, सुजता ढमाले, कल्पना शिंदे, निशा गायकवाड़, दशरथ वाघमारे, व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.




