आरोग्य

आरोग्यम धनसंपदा या मंत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ; डॉक्टर्स डे निमित्त डॉ. सचिन नागापूरकर यांचा लेख..

आरोग्यम धनसंपदा असा पुर्वी पासूनच मंत्र आपल्या भारतीय संस्कृतीत आहे. पण आपण त्याकडे कानाडोळा करत आलो आहोत. आरोग्य, आपली तब्येत हीच आजच्या काळातील संपत्ती आहे हे आज आपल्याला कोरोना व्हायरस विश्व महामारी काळात दिसून आले. गेली साधारण दीड वर्ष झाले भारतात अथवा संपूर्ण जगात ह्या आजारामुळे लाखो लोक मृत्यूमुखी पडले, करोडो लोकांना ह्या आजाराची लागण झाली, काही बरेच दिवस दवाखान्यात दाखल होऊन औषधोपचार घेऊन घरी आले. ह्या दरम्यान एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली ती म्हणजे ज्या रुग्णांची तब्येत शाररिक प्रतिकार क्षमता चांगली आहे अशा रुग्णांनी नक्कीच ह्या आजारावर मात केली. On the occasion of Doctor’s Day, Article by Dr. Sachin Nagapurkar

पुर्वी आपण नेहमीच आरोग्य हीच संपत्ती वगैरे म्हणून बर्‍याच वेळा शालेय व काॅलेज जीवनात निबंध लेखन केले पण प्रत्यक्षात मात्र बरीच मंडळी प्रत्यक्षात मात्र आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत आणि मग अचानक आजारपण आले की मग दवाखान्यात दाखल होणे, खर्च होणे स्वाभाविकच आहे. म्हणून आपण सर्वांनी आज ह्या कोरोना व्हायरस संसंर्ग आजाराच्या निमित्याने का होईना पण प्रत्येकाने आपल्या आरोग्याबाबत जागरूक होणे आवश्यक आहे. नाहीतर आजारांमुळे आपले आर्थिक, सामाजिक ,मानसिक नुकसान होणार हे नक्की

आरोग्यम धनसंपदा असा पुर्वी पासूनच मंत्र आपल्या भारतीय संस्कृतीत आहे. पण आपण त्याकडे कानाडोळा करत आलो आहोत. आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी शालेय जीवनापासूनच सुरूवात केली पाहीजे. सायकल, खो.खो. ,कबड्डी असे मैदानी खेळ खेळले गेले पाहिजेत.

Img 20210522 wa0207

आज काॅलेज जीवनातील अनेक जण हे दारू, सिगारेट,तंबाखू, गुटखा अशा  व्यसनांच्या आहारी गेले आहेत. ही अंत्यत वाईट गोष्ट आहे.  काॅलेज जीवन हेच खरे आपले आयुष्य घडवण्याचे वय असते, ह्या वयात आरोग्य उत्तम ठेवणे आवश्यक असते. तरूण वयातील व्यसनाधीनता एक आजच्या काळातील खूप चिंतेचा विषय आहे. याबाबतीत समाज प्रबोधन आवश्यक आहे..

उत्तम आरोग्य टीकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे अंत्यत गरजेचे आहे, योग्य तो  सकस आहार,नियमित व्यायाम व वाईट सवयी ,व्यसनांपासून दुर राहणे खूप आवश्यक आहे. चाळीशीच्या पुढील लोकांनी आपल्या शरिराची नियमित वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. ज्यायोगे मधूमेह,उच्चरक्तदाब,ह्रदयांचे आजार ह्याचे लवकर निदान व गरजेनुसार उपचार सुरू करण्यात येतील. महिलांनी आपल्या स्तानाची चाचणी, गर्भाशयाची तपासणी ज्या योगे कर्करोगाबद्दल लवकरात लवकर माहीती मिळू शकेल.

आज वाढत्या महागाई मुळे वैद्यकीय उपचार खूप महाग झाले आहेत. आपण जर आपली तब्येत आपले आरोग्य व्यवस्थित ठेवले नाही तर नक्कीच आपल्याला वयापरत्वे लवकर आजार होतील व आर्थिक नुकसान होण्याची भिती वाढत जाईल. म्हणून आजपासूनच आपण सर्वांनी आपले आरोग्य कसे निरोगी राहील ह्या कडे लक्ष देणे आवश्यक आहे आणि आरोग्य हीच संपत्ती आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. आरोग्यम धनसंपदा..

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये