महाराष्ट्र
राज ठाकरेंची पुण्यात सभा; मनसेकडून परवानगीची मागणी

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 21 ते 28 मे दरम्यान पुण्यात सभा घेणार असल्याची माहिती मिळते आहे. राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेसाठी मनसेकडून परवानगी मागण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. विविध पक्षाचे नेते राज्यात जाहीरपणे सभा घेऊन एकमेकांवर टीकेचा भडिमार करताना दिसत आहेत. 1 मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली होती. या सभेत राज ठाकरे यांनी भोग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या सभेनंतर राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं.




