पुणे शहर

मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांचा राजीनामा, राज ठाकरेंना जय महाराष्ट्र! 

पुणे : मनसेचे पुण्यातील फायरब्रॅंड नेते वसंत मोरेंनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. वसंत मोरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मनसेला राम राम केल्याने राज ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. वसंत मोरे हे पक्षातील काही वरिष्ठांवर नाराज असल्याची चर्चा मागील काही महिन्यांंपासून रंगली होती. त्यातच त्यांनी अनेक खदखददेखील व्यक्त केली होती.

 त्यांनी आज सकाळीच ‘एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो’, अशा आशयाची पोस्ट केली होती. त्यानंतर काही तासातच त्यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे

Fb img 17102306685188619560830415393336

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये