पुणे शहर

पुणेकरांना गुडन्यूज; ४० टक्के मिळकत करातील सूट कायम !

पुणे : पुणे महापालिकेच्या मिळकत करामधील ४० टक्के  सवलत कायम ठेवण्याचा आणि तीन पट शास्तीकर रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे २०१० पासूनची देखभाल दुरुस्तीची ५ % वसुलीही केली जाणार नाही.

यावेळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ या बैठकीला उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून या विषयी पाठपुरावा सुरू आहे. या बैठकीस उपस्थित राहून पुणेकरांची बाजू मांडली. त्यावर लागलीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शवत निर्णय घेतला. या निर्णयावर पुढील कॅबिनेट बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.

Img 20220425 wa0010281293566257648464944671

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये