कोथरुड

शिवसेनेतर्फे रक्तदान महायज्ञ शिबीर व सदस्य नोंदणी अभियान

कोथरूड : शिवसेना कोथरूड व प्रबोधन विचारधारा संस्थेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व स्व. जनाबाई बलभीम मोकाटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबीर व शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले.(Blood Donation Mahayagya Camp and Member Registration Campaign by Shiv Sena)

कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन उपनेते रविंद्र मिर्लेकर व संपर्कप्रमुख बाळा कदम यांच्या हस्ते करण्यात आले. माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गेली ७ वर्षे या उपक्रमाचे आयोजन करत असून आजपर्यंत हजारो रक्तदाते या उपक्रमामार्फत जोडले गेले असल्याची माहिती संयोजक माजी नगरसेवक अॅड योगेश मोकाटे यांनी यावेळी दिली. या रक्तदान शिबीरात ५२३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Img 20210116 wa0007

यावेळी बोलताना मिर्लेकर म्हणाले, आजकालच्या जगात सख्या नात्यांमध्ये दुरावा होत असताना रक्तदाना मार्फत जे रक्ताचे नाते जोडले जाते, तेच सर्वोच्च नाते आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राटांची स्मृती जागृत करून त्यानिमित्त रक्तदानाचे पवित्र कार्य म्हणजे खरे अर्थाने त्यांचे विचार आचरणात आणल्यासारखे आहे.

1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020


यावेळी महिला आघाडी संपर्कप्रमुख तृष्णा विश्वासराव, शहरप्रमुख संजय मोरे, सहसंपर्कप्रमुख प्रशांत बधे, महिला आघाडीच्या सविता मते, संगिता ठोसर, शुक्राचार्य वांजळे, दिलीप वेडेपाटील, विशाल धनवडे, विकास पासलकर, महेंद्र काळे, किशोर सोनार, नितीन शिंदे, नंदू घाटे, आनंद गोयल, शिवाजी गाढवे, मधुकर मोकाटे, शिरीष राणे, मयूर वांजळे, यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब मोकाटे, किसनराव मोकाटे, विनायक सुतार तसेच महिला आघाडी, छाया भोसले, शर्मिला शिंदे, प्रज्ञा लोणकर, सविता वायकर, स्वाती ढमाले, सविता बलकवडे, स्नेहल महाजन, भारती भोपळे, प्रिया कवाष्टे, रुपाली मेहता, लता सोनावणे, कस्तुरी पाटील आणि कोथरूड मतदार संघातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते

या शिबिरासाठी पुणे ब्लड बँक व ओम ब्लड बँकचे यांचे सहकार्य लाभले. शिवसेना व प्रबोधन विचारधाराच्या वतीने आयोजक माजी नगरसेवक योगेश मोकाटे यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्या बद्द्द्ल सर्व रक्तदाते आणि कार्यकर्ते, नागरिकांचे आभार मानले. 
 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये