महाराष्ट्र

कांदिवलीत इमारतीला भीषण आग, दोघांचा होरपळून मृत्यू

मुंबई : कांदिवली पश्चिममध्ये साई बाबा नगरमध्ये वीणा संतूर या आठ मजल्यांच्या इमारतीच्या तळमजला आणि पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीत होरपळून २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Img 20230812 wa0001281292979418231884101793

इमारतीत दुपारी १२ वाजून २७ मिनिटांनी आग लागली होती. ही आग इमारतीमधील इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये बिघाड झाल्यानं लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं होतं. अग्निशमन दलाच्या एकूण पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचं काम सुरु आहे.

आगीत लक्ष्मी बुरा, राजेश्वरी भराटे आणि रंजन शाह या जखमी झाल्या आहेत. या पैकी लक्ष्मी बुरा या ४५ ते ५० टक्के तर रंजन शाह या ४५- ५० टक्के होरपळल्या आहेत. राजेश्वर भराटे यांना १०० टक्के भाजलं आहे. तर, ग्लोरी वालफटी वय ४३ वर्षे आणि जोसू जेम्स रॉबर्ट वय ८ वर्ष या दोघांचा मृत्यू झाला आहे. कांदिवलीतील इमारतीत लागलेली आग ही लेवल १ प्रकारातील असल्याची माहिती देण्यात आली आहे. जखमींना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी आहेत. त्यांच्याकडून बचावकार्य व आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

Img 20231023 wa0002281291760857229652946826
Img 20230511 wa0002282292294772633607891151
Img 20230717 wa0012281294517541507444836162
Img 20221228 wa000128229460950061152000874

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये