पुणे शहर

रेमडीसीव्हीर इंजेक्शनच्या जबाबदारीची अट न घालता रुग्णांना दाखल करून घ्यावे, असे आदेश महापालिका आयुक्तांनी रुग्णालयांना द्यावेत : धुमाळ

पुणे : रेमडीसीव्हीर इंजेक्शनची जबाबदारी घेत असला तरच रुग्णालयात दाखल करून घेऊ असे काही खासगी रुग्णालयांकडून कोरोना बाधीत रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सांगण्यात येत असून यामुळे रुग्णांचे हाल प्रचंड होत आहेत. त्यामुळे  महापालिका आयुक्तांनी तातडीने निर्णय घेऊन अशी कोणतीही अट न घालता रुगांना दाखल करून घेण्यात यावे असे आदेश रुग्णालयांना  काढावेत अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

या संदर्भातील निवेदन धुमाळ यांनी महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहे. पुणे शहरात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असून रुग्णालयात जागा उपलब्ध होत नाहीत. महापालिकेने खाजगी रुग्णालयातील ८० टक्के बेड्स ताब्यात घेतले असतानाही रूग्णांना वेळेत बेड उपलब्ध करून देणारी यंत्रणा सक्षमपणे काम करीत नसल्याचे स्पष्ट निदर्शनास येत असून यामुळे रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे अतोनात हाल होत आहेत. 

रुग्णांचे नातेवाईक रूग्णास हॉस्पिटलमध्ये प्रचंड धावपळ करून जागा मिळवतात व जागा उपलब्ध झालेनंतर रुग्णास व त्यांच्या नातेवाईकांस रेमडीसीव्हीर इंजेक्शनची जबाबदारी घेत असाल तर रुग्णालयात दाखल केले जाईल असे सांगितले जात आहे. हे अत्यंत चुकीचे असून याबाबत महापालिकेने तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.

Img 20210223 wa0156

वास्तविक रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा प्रचंड प्रमाणात असून रुग्णांचे नातेवाईक हे इंजेक्शन मिळविण्यासाठी धडपत करत असतात, अशी संपूर्ण शहरात परिस्थिती आहे. रुग्णांचे नातेवाईकांना इंजेक्शन मिळणेचा कालावधी याबाबत काही स्पष्टता नसते. परंतू इंजेक्शन रूग्णालयाकडे शासनाकडून पुरविले जात आहे. पण मागणी जास्त असल्याने रुग्णालयांकडून रेमडिसिवीर इंजेक्शनची जबाबदारी घेत असाल तर रुग्णालयात दाखल केले जाईल असे सांगितले जाणे म्हणजे एक प्रकारे रुग्णालयांकडून कायद्याची पायमल्ली होत असल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे.

पुणे महापालिकेचे रूणालय व खाजगी रुग्णालयांना रेमडिसिवीर इंजेक्शनची जबाबदारी घेत असाल तर रूग्णालयात दाखल केले जाईल असे न सांगता रूग्णांना तातडीने दाखल करून त्यांचेवर उपचार चालू करणे ही त्यांची कायदयाने जबाबदारी आहे. रेमडिसिवीर इंजेक्शन रुग्णालयास देखील वेळोवेळी मिळणार असून त्यामधून  उपचार होऊ शकतात. तसेच नातेवाईक देखील इतर ठिकाणाहून इंजेक्शन आणून देत असतात, परंतू यासाठी कालावधी जातो, तोपर्यंत एखादा रूग्णास दाखल केले नाही व त्यावर उपचार चालू केले नाही तर सदर रूग्ण अत्यवस्थ होवू शकतो ही बाब लक्षात घेवून पुणे महापालिकेचे रूणालय व खाजगी रुग्णालयांना रेमडिसिवीर इंजेक्शनची जबाबदारी घेत असाल तर रुग्णालयात दाखल केले जाईल असे न सांगता रुग्णांना तातडीने दाखल करून त्यांचेवर उपचार चालू करणेबाबत आदेश देण्यात यावेत अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये