१ मे पासून वय वर्ष १८ च्या पुढील सर्वांना लस मिळणार ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

दिल्ली : दिवसेंदिवस देशातील कोरोनाची संख्या वाढत चालली आहे. आता पर्यंत वय ४५ पुढील नागरिकांना कोरोनाची लस दिली जात होती, पण आता कोरोनाचा वाढत चाललेला संसर्ग लक्षात घेत केंद्र सरकारने लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला असून आता आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व जण लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत आज हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
लसीकरण मोहिमेस सुरवातीला 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लस देण्यास प्रारंभ करण्यात आला . 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास सूरवात झाली. आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यााच निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
Govt of India announces liberalised & accelerated Phase 3 strategy of COVID-19 vaccination from May 1; everyone above the age of 18 to be eligible to get vaccine pic.twitter.com/7G3WbgTDy8
— ANI (@ANI) April 19, 2021
लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात कंपन्यांना लस खुल्या बाजार विकण्यास परवानगी दिली गेली आहे. कंपन्यांनी एका महिन्यात निर्मिती केलेल्या लसीच्या 50 टक्के लसी सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीला म्हणजे केंद्र सरकारला द्यायच्या आहेत. उरलेल्या 50 टक्के लसी राज्य सरकार आणि खुल्या मार्केटला देण्याचा निर्णय घेतला असून याबाबत ची माहिती ए एन आय ने ट्विटर द्वारे दिली आहे.
Private hospitals would have to procure their supplies of Covid-19 vaccine exclusively from the 50% supply earmarked for other than Govt of India channel: Govt of India (2/3)
— ANI (@ANI) April 19, 2021




