पुणे शहर
मुरलीधर मोहोळ यांची भाजप प्रदेश सरचिटणीस पदी निवड

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
भाजप च्यावतीने राज्यातील संघटनात्मक पदांवरील नियुक्त्या आज करण्यात आल्या. यामध्ये पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माधवी नाईक, ठाणे, विक्रांत पाटील रायगड, रणधीर सावरकर अकोला, संजय केणेकर संभाजीनगर यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र भाजपकडून प्रसिद्धीस देण्यात आले आहे.



