पुणे शहर

मुरलीधर मोहोळ यांची कर्वेनगरमधून  पदयात्रेद्वारे प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात..

पुणे : पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ Muralidhar Mohol यांचा आज खऱ्या अर्थाने प्रचार सुरू झाला. कर्वेनगर भागात त्यांची पदयात्रा पार पडली. गेल्या महिन्यात १३ मार्च रोजी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आत्तापर्यंत त्यांनी वैयक्तिक गाठीभेटी, पक्षीय मेळावे, समाजांचे मेळावे यावर भर दिला होता. आज कोथरूड मतदार संघातील कर्वेनगर भागात पदयात्रा काढत त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला.

यावेळी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, संदीप बुटाला , माजी नगरसेवक दीपक पोटे, राजेश बराटे, सुशील मेंगडे, वृषाली चौधरी, जयंत भावे, विनोद मोहिते, विठ्ठल बराटे, पुनीत जोशी, बाळासाहेब बराटे, माणिक दुधाने, चेतन भालेकर, शिवराम मेंगडे, सचिन फोलाने, अजय मारणे, महेश पवळे, दत्ता चौधरी, गणेश पासलकर, गिरीश खत्री, प्रशांत हरसुले, गिरीश भेलके, दिनेश माथवड, सचिन मोकाटे, बाळा  टेमकर, दुष्यंत मोहोळ, गजानन माझीरे, वरद गाडगीळ आदी  यावेळी उपस्थित होते.

Img 20240404 wa00195661228638643442239

कर्वेनगर भागातील मावळे आळी येथील बौद्ध विहारापासून मुरलीधर मोहोळ यांच्या पदयात्रेला जोरदार सुरुवात झाली. त्यानंतर गोसावी वस्ती, श्रमिक वसाहत, वडार वस्ती, हिंगणे होम कॉलनी या भागातून पदयात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी गणेश मंडळांच्या वतीने मोहोळ यांचे फटाके वाजवून तर महिलांकडून औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Img 20240404 wa00142311409567432001146
Img 20240404 wa00154462680026350583661

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये