महाराष्ट्रराजकीय

संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर : नारायण राणे

मुंबई : संजय राऊतांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर आहे. त्यांना सुपारी मिळाली आहे, संजय राऊतांची कुंडली माझ्याकडे आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

नारायण राणेंनी मुंबईत भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांवर निशाणा साधला. संजय राऊतांनी भाजपवर केलेल्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांची आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद होती असं म्हणत त्यांनी उपहासात्मक टीका केली.

“संजय राऊत यांची पत्रकार परिषदेला केविलवाणी परिस्थिती झाली होती. घाम फुटला होता. ते वारंवार सांगत होते की मी कुणाला घाबरत नाही. मर्दांची शिवसेना आहे. पण मर्द माणसाला मर्द आहे हे सांगायची गरज नसते. जो घाबरतो, तोच वारंवार सांगत असतो की मी कुणाला घाबरत नाही”, असं राणे यांनी सांगितले.

“पत्रकार परिषदेची जाहिरात सांगत होती की राज्यभरातले नेते, मंत्री येणार. पण साधे विभाग प्रमुखही आले नव्हते. शिवाजी पार्कचे विभाग प्रमुख नव्हते. नाशिकचे मात्र काही मोजके नेते होते. कारण संपर्क प्रमुख आहेत ते”, याकडे राणे यांनी लक्ष वेधले.

“संजय राऊत 2 जून 1992 ला शिवसेनेत आले. सामनामध्ये संपादक म्हणून आले. मार्मिकमधून हकालपट्टी झाली मग ‘लोकप्रभा’ला गेले. ‘लोकप्रभा’त असताना त्यांनी पराक्रम केले. त्यांनी तेव्हा बाळासाहेब ठाकरेंविरुद्ध अनेक लेख लिहिले. साहेबांनी हा कसा पत्रकार आहे याविषयी बोललं होतं. संजय राऊत अंतर्गत आग कशी लावता येईल हे पाहात असतो, असं बाळासाहेब म्हणाले होते”, असं देखील राणे म्हणाले. शिवसेनेसाठी पत्रकार परिषद घेतली की स्वत: अडचणीत आहेत म्हणून घेतली? जणू शिवसेना प्रमुख हेच झालेत अशा आवेशात पत्रकार परिषद घेतली, असं राणे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये