सिनेजगत

‘मुस्लिमांचा द्वेष करण्याची फॅशन….’ : नसीरुद्दीन शाह

मुंबई : बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह त्यांच्या दमदार अभिनयासोबतच स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. ते त्यांचं मत ठामपणे मांडतात. चाहत्यांकडून अनेकदा त्यांना समर्थन मिळतं तर अनेकदा विरोधाचा सामनाही करावा लागतो. अलीकडेच एका मुलाखतीत त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे.

Img 20230511 wa00027384472977045778543

नसीरुद्दीन शाह हे सध्या ZEE5 च्या वेब सीरिज ‘ताज – डिवाइडेड बाय ब्लड’ साठी चर्चेत आहेत. यात त्यांनी राजा अकबराची भूमिका साकारली आहे. द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना नसीरुद्दीन शाह म्हणाले, ‘द केरळ स्टोरी’ हा प्रचारात्मक चित्रपट आहे. होय, अर्थातच, ही चिंताजनक बाब आहे. सत्ताधारी पक्षाने अतिशय हुशारीने याचा वापर केला आहे. सुशिक्षित लोकांमध्येही मुस्लिमांचा द्वेष करण्याची फॅशन बनली आहे. आपला देश धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणारा आहे. मग प्रत्येक गोष्टीत धर्म का आणतोय?” असं म्हणत या अभिनेत्याने सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे.

Img 20220425 wa0010282295345156635031542582

अभिनेता नसीरुद्दीन शाह पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगही अशा गोष्टींवर काहीही बोलत नाही. आपल्या देशातील राजकीय पक्ष निवडणुकीत धर्माचा खुलेआम वापर करतात. इतकेच नाही तर अल्लाह हू अकबरच्या नावाने कोणत्याही मुस्लिम नेत्याने मते मागितली असती तर आतापर्यंत गदारोळ झाला असता.

एका मुलाखतीत अभिनेता नसीरुद्दीन शाह यांनी कर्नाटक निवडणुकीचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल भडक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी निवडणुकीसाठीही धर्माचा वापर करतात, मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. धर्माचा हा वापर लवकरच संपेल असे मला वाटते. असं मत व्यक्त केलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये