पुणे शहर

स्पीकरचा आवाज कमी करायला सांगणाऱ्या ज्येष्ठाला, त्यांच्या मुलाला मारहाण; ज्येष्ठाची आत्महत्या

पुणे : स्पीकरचा आवाज कमी करायला सांगणाऱ्या ज्येष्ठासह त्यांच्या मुलाला मारहाण करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. या घटनेने दुखावलेल्या ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Img 20230511 wa00027384472977045778543

ज्ञानेश्वर महादेव साळुंखे (वय 70) व त्यांचा मुलगा पांडुरंग साळुंखे यांना स्पीकरच्या आवाजाचा त्रास होत असल्याने त्यांनी हळदी समारंभ असणाऱ्या चेतन बेले याला स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितले. त्यावेळी चेतन बेले, पवन गायकवाड, यश मोहिते, देवेश पवार, हेमंत वाकडे, जय बाळकुंभे, सादिक शेख, शाहरुख शेख, सनी धुमाळ यांनी ज्ञानेश्वर महादेव साळुंखे (वय 70) यांना जबर मारहाण केली. पांडुरंग साळुंखे यांना डोक्यात कोयता मारून गंभीर जखमी केले. या घटनेने दुखावलेले ज्येष्ठ नागरिक ज्ञानेश्वर साळुंखे यांनी रात्री सव्वाअकराच्या सुमारास बंडगार्डन येथे नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली.

या घटनेने येरवडा परिसरात खळबळ माजली असून साळुंखे कुटुंबीय भयभीत झाले आहे. या प्रकरणी दोषींवर कायदेशीर गुन्हा दाखल करावा यासाठी सोमवारी दिवसभर ते येरवडा पोलीस स्टेशन येथे थांबून होते. यानंतर संध्याकाळी उशिरा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या गंभीर घटनेची दखल घेऊन दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी चेतन बेले याला ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित फरार आरोपींचा शोध येरवडा पोलीस घेत आहेत. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक दर्शना शेलार करीत आहेत.

Img 20220425 wa0010282295345156635031542582

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये