राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या उमेदवारांचे फटाक्यांच्या आतिषबाजी अन् पुष्पवृष्टीने जंगी स्वागत; प्रभाग क्र. ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर मधील बाईक रॅलीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी च्या प्रभाग क्र. ११ रामबाग कॉलनी–शिवतीर्थ नगर चे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर,तृप्ती निलेश शिंदे, कांता नवनाथ खिलारे यांच्या प्रचारार्थ माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित भव्य बाईक रॅली उत्साहात संपन्न झाली. नागरिकांनी जागोजागी रॅलीचे जल्लोषात स्वागत केले. या झालेल्या बाईक रॅलीमुळे पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने चांगलीच आघाडी घेतलेली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या प्रचार बाईक रॅलीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशाच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आणि पुष्पवृष्टीने ठिकठिकाणी अधिकृत उमेदवार हर्षवर्धन मानकर,तृप्ती शिंदे,कांता खिलारे यांचे ठिकठिकाणी नागरिकांकडून जंगी स्वागत करण्यात आले. रॅलीच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून नागरिक हात उंचावून पाठिंबा दर्शवीत होते. फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी यांसह अनेक ठिकाणी महिला औक्षण करण्यासाठी पुढं येत होत्या. विशेष म्हणजे तरुणांचा जल्लोष आणि संपूर्ण रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो, कामाचा वादा अजितदादा, अजितदादा तुम आगे बढो, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

ही बाईक रॅली विठ्ठल मंदिर ए.आर.ए.आय. रोड- राऊतवाडी-केळेवाडी-विश्वशांती चौ- हनुमाननगर-भारती विद्यापीठ चौक-कानिफनाथ मित्र मंडळ चौक-रामबाग कॉलनी- किष्किंधानगर- म्हातोबानगर- मोठा गणपती चौक-सुतारदरा- चार नळ चौक- पेठकर साम्राज्य चौक- माथवड अंगण- जयभवानीनगर- त्रिमूर्ती चौक, गुरुदत्त रिक्षा स्टँड चौक येथे समारोप झाला. माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली ही बाईक रॅली संपन्न झाली.
या बाईक रॅलीमध्ये दीवा प्रतिष्टानचे अध्यक्ष करण मानकर,राजवर्धन हर्षवर्धन मानकर,गणपत भगत, साष्टे मामा,चंद्रकांत कुदळे,गजानन ढमाले,राजू खरसाडे, मिलिंद वाघमारे, निलेश शिंदे,नवनाथ खिलारे,वेंकटेश भंडारी, राजू मगर, मच्छिंद्र गोडांबे,अब्बास शेख,जावेद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला,तरुण वर्ग, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



