वारजेचा गड आम्ही जिंकणारच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विश्वास; खासदार सुप्रिया सुळे प्रचारासाठी पदयात्रेत सहभागी

प्रभाग क्रमांक 32 वारजे- पॉप्युलर नगर प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचाराचा धडाका
पुणे : पुणे महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त प्रभाग क्रमांक ३२ वारजे पॉप्युलर नगर मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेत खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या.
प्रभाग क्रमांक ३२ वारजे पॉप्युलर नगर प्रभागात आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपाली धुमाळ,किरण बारटक्के,सचिन बराटे, अश्विनी किशोर कांबळे यांना प्रभागाच्या प्रगतीबरोबर पुण्याला खऱ्या अर्थाने स्मार्ट बनवण्यासाठी विजयी करावे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे.याप्रसंगी आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वारजे पॉप्युलर नगर प्रभाग क्रमांक ३२ हा चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार दीपाली धुमाळ, सचिन बराटे,किरण बारटक्के, अश्र्विनी कांबळे यांच्या वतीने घरोघरी भेटी, सभा आणि पदयात्रा व्दारे नागरिकांशी संवाद साधला जात असून त्यांना जोरदार पाठिंबा मिळत आहे.
निवडणूक जाहीर झाल्यापासून वारजे पॉप्युलरनगर या प्रभागांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मात्र, या प्रभागात निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या तीन माजी नगरसेवकांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश करून त्यातील दोघांनी भाजपची उमेदवारी मिळवली आहे. या पक्षांतरामुळे प्रभागातील राजकीय समीकरणे बदलली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग अद्याप पक्षासोबत असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्रिय आहेत. विकासकामे, स्थानिक समस्या सोडवणे आणि पक्षाच्या धोरणांवर भर देत प्रचार केला जात आहे.



